रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशाची बॅग लांबवली

रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान झोपलेल्या प्रवाशाची हॅन्डबॅग लांबवून अज्ञाताने सुमारे 48 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. ही घटना 3 एप्रिल रोजी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर घडली होती.

याबाबत फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,3 एप्रिल रोजी ते पत्नी आणि सासरे असे मत्स्यगंधा ऐक्सप्रेसने मुलकी रेल्वेस्टेशन येथून ठाणे येथे जात होते.प्रवासात ते सर्व झोपी गेलेले असताना रेल्वे रत्नागिरी रल्वेस्टेशनवर थांबली असताना अज्ञात चोरट्याने त्यांची हॅन्ड बॅग लांबवली.या बॅगमध्ये 38 हजार 220 रुपयांचे मणी मंगळसूत्र,3हजार 200 रुपयांची अंगठी आणि 6 हजार 25 रुपयांचा मोबाईल असा एकूण 47 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल लांवबला होता.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.