रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीचे शासकीय काम करत असतानाच मारहाण झाल्याची घटना 21 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णाजीराव नागेश्वरराव (53, पडवेवाडी कुवारबाव, मिरजोळे, रत्नागिरी) हे नेत्रावती एक्सप्रेसने येणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासत होते. यावेळी संशयित आरिफ समीर खान (19, के. सी. जैन नगर, मारुती मंदिर रत्नागिरी) हा गेट नंबर 2 ने बाहेर जाताना दिसला. त्याच्याकडे तिकिटाची विचारणा केली असता मोठमोठ्याने आरडाओरड करू लागला. त्यावेळी टीसी नागेश्वरराव यांनी त्याला पकडून ठेवले. यावेळी खान याने धकलाबुकल करून टीसीच्या शर्टचा खिसा फाडला. व त्यांच्या गळ्यातील चेन तोडून नुकसान केले.
नागेश्वरराव यांनी याबाबतची फिर्याद शहर पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात संशयित आरिफ खान याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.