रत्नागिरी:-रत्नागिरी रेल्वेस्टेशन फाटा येथे तीन गाड्यांमध्ये धडक होवून अपघात झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नाही. अपघातातील इनोव्हा, टेम्पो ट्रॅव्हल व दुचाकीचे मोठे नुकसान झाले तसेच काम सुरू असलेल्या या मार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडीही झाली होती.
25 मार्च 2024 रोजी रेल्वेस्टेशन फाटा येथे टेम्पो ट्रॅव्हल्स (एमएच 04 जीपी 1652) तसेच इन्होव्हा कार व दुचाकी यांच्या जोराची धडक झाली. या अपघातात इव्होव्हा कारचे बोनेटही उखडले होते सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी झाले नाही. सुट्टीचा दिवस असल्याने यावेळी वाहनांची संख्या कमी होती. असे असतानाही अपघातामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. याच ठिकाणी असलेल्या पोलीस चौकीमुळे पोलिसांनी घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत केली.