रत्नागिरी येथे चक्कर येऊन पडलेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- दुचाकी रस्त्यात लावून दुचाकीवरुन उतरलेल्या महिलेला अचानक चक्कर येऊन ती रस्त्यावर पडली. तिच्या डोक्याल दुखापत झाल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. श्रावणी सुधीर गोवळकर (वय ४३, रा. मुरुगवाडा पांढरा समुद्र, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २५) रात्री पावणे दहाच्या सुमारास आरे पुलावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुधीर गोवळकर हे गाडी बाजूला लावत असताना त्यांची पत्नी हिला अचानक चक्कर आली आणि त्या रस्त्यावर पडल्या त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान मंगळवारी (ता. २६) रात्री पावणे दहाच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.