रत्नागिरी:- भारत सरकार पुरस्कृत नाबार्ड अर्थसहाय्यित व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या रत्नागिरी तालुका मँगो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.5 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. खंडाळा हायस्कूल येथील भव्य सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.
यावेळी व्यासपिठावर जिल्हा कृषी अधिक्षक सौ सुनंदा कुर्हाडे मॅडम, जिल्हा कृषी विकास अधिकारी, मा. श्री. अजय शेंड्ये सर, नाबार्डचे डि.डि.एम, मा. श्री मंगेश कुलकर्णी सर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी मा. श्री सागर साळुंखे सर, टेक्नोसर्व्हचे श्री गजानन पाटील सर, स्मार्ट प्रकल्प रत्नागिरीचे लेखापाल श्री देव फोंडेकर, सि.बी.बी.ओ श्री संदिप कांबळे, रत्नागिरी तालुका मँगो फार्मर्स कंपनीचे नवनियुक्त चेअरमन मा.श्री. उमेश रहाटे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला रत्नागिरी तालुका मँगो फार्मर्स कंपनीच्या सर्व संचालकांनी कंपनीच्या चेअरमन पदासाठी श्री. उमेश रहाटे यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा दिल्याने उमेश रहाटे यांची कंपनीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे यावेळी जाहिर करण्यात आली.
या सभेप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा कृषी अधिक्षक सौ सुनंदा कुर्हाडे मॅडम यांनी सांगितले की, या परीसरातील सर्व शेतकर्यांनी या कंपनीच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन सर्व प्रकारच्या शेती किंवा बागायतीमधून दर्जेदार उत्पादन घ्यावे व आर्थिक सुबत्ता साधावी. तसेच या कंपनीने सुद्धा शेतकर्यांसाठी नवनविन संकल्पना राबवाव्यात जेणेकरून अधिकाधिक शेतकरी या कंपनीला जोडले जातील. कंपनी तसेच या कंपनीची आर्थिक उलाढाल जास्तीत जास्त होऊन कंपनी लवकरच नावारूपाला येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री अजय शेंड्ये यांनी स्मार्ट योजनेबाबत शेतकर्यांना बहुमोल मार्गदर्शन करताना स्मार्ट योजनेच्या अंतर्गत सबसिडिचे भागधारक होण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे नाबार्ड चे डि.डि.एम. श्री मंगेश कुलकर्णी यांनी कंपनीच्या उन्नतीसाठी नाबार्डचे मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच राहील असे आश्वासन दिले.
यावेळी कंपनीच्यावतीने प्रगतीशील शेतकरी आंबा, काजू या पिकांसोबतच भाजी व भातशेतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल प्रगतीशील शेतकरी श्री मिलींद वैद्य आणि श्री विकास किंजळे यांचा सन्मानचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते भागधारकांना शेअर सर्टिफिकेटचे वितरण करण्यात आले.
सभेचे अध्यक्ष व कंपनीचे नवनियुक्त चेअरमन श्री उमेश रहाटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, कंपनीचे भागधारक व सर्व शेतकर्यांच्या आंबा, काजू, सुपारी या पिकांसाठी टेक्नोसर्व्हे व जे. एस. डब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून शेतकर्यांना जास्तीत जास्त भाव कसा देता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच कंपनीच्या माध्यमातून शेतकर्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. कंपनीची ध्येय आणि उद्दीष्टे स्पष्ट करताना श्री. उमेश रहाटे यांनी सांगितले की, आंबा, काजू, फणस, करवंद, कोकम आणि अन्य फळांवर प्रक्रिया उपयोग उभे करणे, शेतकर्यांच्या उत्पादित पिकांना योग्य दर मिळवून देणे, बी-बियाणे, खते व शेती उपयोगी अवजारे पुरवणे, शासन व बँकांच्या माध्यमातून विविध प्रक्रिया प्रकल्प उभारणे, खरेदी-विक्री केंद्र उभारणे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उत्पादित मालाची विक्री करणे, बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी करणे, मत्स्य प्रक्रिया उद्योग उभे करणे व शेतकयांना आर्थिक सुबत्ता मिळवून देण्यावर या कंपनीचा प्रयत्न राहणार असल्याचे रहाटे यांनी शेवटी सांगितले. परीसरातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी स्वतःच्या उज्वल भविष्यासाठी शेअर्स घेऊन या कंपनीचे भागधारक होण्याचे आवाहनही यावेही श्री रहाटे यांनी केले.
या सभेला कंपनीचे संचालक श्री प्रकाश पवार, उदय जोग, डॉ राजेंद्र विचारे, हेमंत सुर्वे, संदिप कांबळे, सुनिल भोजे, राकेश महाडीक, श्री निमा विचारे, मंगेश कुट, कंपनीच्या सी.ई.ओ ऐश्वर्या माने, संध्या वीर व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री सुनिल भोजे यांनी केले तर श्री उदय जोग यांनी उपस्थित मान्यवरांचे व शेतकर्यांचे आभार व्यक्त केले. यानंतर अध्यक्षांच्यावतीने कार्यक्रम संपला असे जाहिर करण्यात आले.