रत्नागिरी :-भाजपा रत्नागिरीने आज जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीसाठी त्यांच्या मागणी प्रमाणे 24 बाटल्या रक्तदान केले. भाजपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत 100 रक्तदात्यांनी नोंदणी केली होती पण 24 बाटल्यांची आवशकता असल्याने 24 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
भाजपा रत्नागिरी कार्यालयात रक्तदानाचा उपक्रम सोशल डिस्टंससह सर्व काळजी घेऊन करण्यात आला . या प्रसंगी युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम जैन यांनी ही रक्तदान केले. भाजपा शहर अध्यक्ष सचिन करमरकर, मनोज पाटणकर , रानडे, पमु शिवालकर , श्रीरंग प्रभुदेसाई, श्री व सौ.भिडे आदी 24 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या प्रसंगी सचिन वाहळकरकर, मुन्ना चवंडे, समीर तिवरेकर, राजू तोडणकर ,उमेश कुळकर्णी, सौ. मानसी करमरकर ,राजू भाटलेकर, बाबू सुर्वे यांचेसह अनेक पदाधिकारी सोशल डिस्टन्सचे महत्व सांभाळून उपस्थित होते.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी आदरांजली अर्पण केली व भाजपा कार्यकर्ते सेववृत्ती ने काम करत आहेत कोरोना संकट काळी समाजाच्या अडचणी सोडवण्या साठी जागृतपणे कार्यकर्ते काम करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रक्तदान उपक्रम राबवला भाजपा रत्नागिरीने रक्तदात्यांची सूची तयार केली आहे गरजे नुसार रक्तदानासाठी कार्यकर्ते सिद्ध असतील असे सांगितले.
या आपत्तीवेळी कोरोना रोगावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक घटकाबरोबर भाजपा कार्यकर्ते सहाय्यकाची भूमिका घेऊन तयार असतील. आज रक्तदान केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सर्वोत्तम दान केल्याबद्दल दीपक पटवर्धन यांनी धन्यवाद दिले.