रत्नागिरी:- शहरातील बाजारपेठ येथे व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. वारंवार मागण्यात येणाऱ्या खंडणीमुळे व्यापाऱ्याने कंटाळून अखेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुसैन नाजीम हकिम व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील बाजारपेठ येथील एका व्यापाऱ्याकडे अनेक वेळा खंडणीची मागणी करण्यात आली. मार्च 2020 ते 10 जून 2023 या कालावधीत वारंवार मागणी करण्यात आली. बदनामीच्या भीतीने व्यापाऱ्याने 1 लाख 21 हजार रुपये दिले. मात्र त्यांची मागणी वाढतच चालली. या वाढत्या मागणीला कंटाळून व्यापाऱ्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी खंडणी पकरणी हुसैन नाजीम हकिम व अन्य एकावर भादविकलम 384, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.