रत्नागिरी पाठोपाठ खेड येथील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

खेड:- खेड-दापोली मार्गावरील चिंचघर वेताळवीडी येथील दवबिंदु फार्महाऊसवर अवैध व बेकायदेशीर मुली पुरवून वेश्यव्यवसाय करणारा रविंद्र गणपत गावडे (वय 50) व एक संशयीत महिला यांना ताब्यात घेतले आहे. दोघांवर येथील पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 218/2023 मध्ये भादवि 370 व अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 3, 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार दि 28/7/2023 रोजी दुपारी 2.40 वाजताच्या सुमारास घडली. या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

पोलीस कंट्रोल रुमकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील खेड ते दापोली मार्गावरील चिंचघर वेताळवाडी येथे दवबिंदु नावाचा फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर वेश्याव्यवसाय चालतो, अशा प्रकारची गोपनीय माहीती पोलीसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलीसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत संशयीत हे खेड येथील मुलींना भेडसावणाऱ्या आर्थिक गरजेपोटी व पैशाच्या टंचाईचा फायदा घेत गिऱ्हाईक पुरवुन अनैतिक वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत होते. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर संशयीत उपजीविका करीत होते.

रविंद्र गावडे व एक महिला यांच्यावर येथील पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखीन कोण कोण अडकलेले आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, रत्नागिरी येथील वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता खेडमध्ये हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कसून चौकशी करुन या धंद्यात असलेल्यांची पाळेमुळे खणून काढावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.