रत्नागिरी नॅनोसिटी येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- शहराजवळील नॅनोसिटी सिटी फेज येथील तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणातून सिलींग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रसाद राजाराम पाचकले (वय २५, रा. नॅनोसिटी फेज २ फ्लॅट नं ३०१ मुळ ः मानसकोड, रत्नागिरी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १५) सकाळी सव्वा आठच्या सुमारास नॅनो सिटी फेज २ येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रसादने घरी एकटाच होता. कोणत्यातरी घरगुती कारणावरुन बेडरुमधील सिलींग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तरीय तपासणीसाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.