रत्नागिरी:- तालुक्यात पुन्हा कोरोनाचे 27 पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले आहेत. बुधवारी रात्री आलेल्या अहवालानुसार तालुक्यात 27 रुग्ण सापडले. यापैकी तब्बल सात पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या पावस परिसरात सापडले आहेत.
आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून प्रत्येक सार्वजनिक क्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी बाजारपेठेत ही चाचणी करण्यात आली. या नंतर महावितरण तर काल नगर परिषद कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. नगर परिषदचे 107 पैकी 107 अहवाल निगेटिव्ह आले.
शिवाजीनगर परिसरातील एका बँकेच्या झोनल ऑफिसमधील कर्मचाऱ्यांची सुद्धा चाचणी करण्यात आली. यात 3 कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले आहेत.
याशिवाय रत्नागिरी तालुक्यात सापडलेल्या 27 नव्या रुग्णांमध्ये पावस परिसरात तब्बल सात बाधित रुग्ण सापडले आहेत. पावस परिसरात दोन दिवसांपासून कोरोनाचा वेगाने फैलाव होताना दिसून येत आहे.
सापडलेले सातही रुग्ण एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. याशिवाय जे के फाईल्स येथे 1, 1 पोलीस कर्मचारी, खडपे वठार 1, मारुती मंदिर 1, वाटद खंडाळा 2, संगमेश्वर 1, गावडेआंबेरे 1, नाचणे 2, कर्ला 1, चिपळूण 1, कुवारबाव 1, गयाळवाडी 2, पठाणवाडी 1, अभ्युदय नगर 1, पेठकिल्ला 1, जेलरोड 1आणि जुवे येथे एक रुग्ण सापडला आहे.