रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे 19 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा याबाबतचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात पाच अँटिजेन टेस्ट केलेल्यांचा समावेश आहे.
मागील काही कालावधी पासून तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी रात्री उशिरा अहवाल प्राप्त झाले असून या अहवालानुसार तालुक्यात 19 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
यात चर्मालय येथे 2, नाचणे, जेलरोड, लाजुळ, जुनी तांबट आळी, अलोरे, कुरतडे, संगमेश्वर, जयगड, परटवणे, झाडगाव, साळवी स्टॉप, टिळक आळी, घुडे वठार, काजरघाटी, गावखडी, साखरपा आणि लांजा या भागात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.