रत्नागिरी:-गुरुवारी रत्नागिरी तालुक्यात 12 नवी कोरोना बाधित क्षेत्र घोषित करण्यात आली. यात मौजे एकता नगर कोळंबे, मौजे साई भूमी नगर शिरगाव, पारस ओसीअन व्हू अपार्टमेंट थिबा पॅलेस, शासकीय वसाहत आरोग्यमंदीर, आंबेशेत कुर्टेवाडी, उत्कर्षनगर कुवारबाव, विठ्ठल मंदीर मागे कुवारबाव, प्रतिभा महिला वसतीगृह, संभाजीनगर नाचणे, तारा ऑर्कीड माळनाका, मौजे सैतवडे चिंच बंदर, मेंटल हॉस्पीटल, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
संस्थात्मक विलगीकरणात सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 49, समाजकल्याण, रत्नागिरी – 6, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 34, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -11, कोव्हीड केअर सेंटर घरडा – 1, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 3, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 21, गुहागर – 1, संगमेश्वर – 1 असे एकूण 127 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.