रत्नागिरी तालुक्यात दोन दिवसात 56 नवे पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात दोन दिवसात 56 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात रिंगणे लांजा, तेली आळी, पऱ्याची आळी, नाणीज या भागात नवे रुग्ण सापडले आहेत.
 

मागील काही दिवसापासून रत्नागिरीत कोरोना रुग्ण सापडण्याचा वेग मंदावला होता. मात्र रविवारी रात्री 25 तर सोमवारी रात्री 31 नवे रुग्ण एकट्या रत्नागिरी तालुक्यात सापडले आहेत.

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये नाणीज येथे 7 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय के सी जैन नगर 3, रिंगणे लांजा येथे 6, जे के फाईल 2, पऱ्याची आळी 2, तेली आळी 4, राजेंद्र नगर 2, खेडशी 3 यासह 56 रुग्ण सापडले आहेत.