रत्नागिरी तालुक्यात खुल्या प्रवर्गातील ग्रामपंचायतींमध्ये महिलांना पुन्हा संधी

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज झाली. यामध्ये अनुसिचत जातीसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 47 ठिकाणी महिला सरपंच विराजमान होणार आहेत. तर उर्वरित 47 ठिकाणी पुरूष सरपंचांना संधी मिळणार आहे. गेल्या पंधरा ते विस वर्षांमधील पडलेल्या आरक्षणाचा विचार करून हे आरक्षण टाकण्यात आले. काही जागांसाठी चिठ्ठी काढुन आरक्षण सोडत केली. परंतु अनेक ठिकाणी महिला आरक्षण पडल्याने आणि खुल्या प्रवर्गामध्ये महिलंना पुन्हा संधी मिळणार असल्याने ग्रामीण भागातील इच्छुक पुरूषांच्या स्वप्नावर पाणी फिरले असून ग्रामपंचायतींवर महिला राज येणार हे निश्चित झाले आहे.

येथील वि. दा. सावरकर नाट्यगृहामध्ये मंगळवारी सकाळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थित 2025 ते 20230 या कालावधीसाठीचे सरपंच आरक्षण सोडत घेण्यात आली. सकाळी अकराला सुरू होणारी ही सोडत लोकांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने साडे अकरा वाजेपर्यंत सुरू करण्यात आले नव्हते. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शिवसेनेचे व अन्य पक्षाचे पदाधिकारी गोळा झाल्यानंतर ही सोडत सुरू झाली.

तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींपैकी सुरवातील अनुसुचित जातीसाठीच्या 5 जागांकरीता आरक्षण सोडण्यात आले. यामध्ये कशेळी आणि हरचेरी महिला सरपंचपदासाठी आरक्षित झाले. तर धामणसे, वाटद, कुरतडे हे खुले आरक्षण पडले. यामध्ये अनुसुचित जातीचा पुरूष किंवा महिलेला उभा रहाता येणार आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गातील 26 ग्रामपंचायतीसाठी आरक्षणसोडत घेण्यात आली. यामध्ये गावडे आंबेरे, पाली, खरवते, रिळ, कापडगाव, हातखंबा, पोमेंडी खुर्द, साखर मोहल्ला, मिऱ्या, कोळंबे, जयगड आणि चिठ्ठी टाकुन फणसवणे आणि पिरंदवणे या 13 जगांवर महिला आरक्षण पडले. यातील उर्वरित 13 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग खुल्या गटासाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये मेर्वी, कळझोंडी, निवळी, उक्षी, पावस, चाफे, भाट्ये, चरवेली, नाखरे, आगरनरळ, मावळंगे, शिरगाव, पानवल या 13 ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. यामध्ये स्त्री, पुरूष कोणही उमेदवार उभा राहु शकतो.

सर्वसाधारण या प्रवर्गाच्या 63 ग्रामपंचायतींचे सोडत काढण्यात आली. यामध्ये 32 ग्रामपंचयाती स्त्री राखीव नव्हत्या त्या थेट महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये काळबादेवी, देऊड, चांदेराई,

तरवळ, शिवार आंबेरे, विल्ये, नाचणे, नाणीज, बोंड्ये, टेभ्ये, टिके, सत्कोंडी, वळके, वेतोशी, वरवडे, गावखडी, खेडशी, मिरजोळे, खानू, कोतवडे, गडनरळ, मजगाव, लाजूळ, दांडेओडोम, सैतवडे, नेवरे, डोर्ले, खालगाव, जांभरूण, जांभारी, चवे, नांदिवडेचा समावेश आहे.

उर्वरित 32 जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे. यामध्ये चाफेरी, गोळप, पोमेंडी बुद्रुक, कर्ला, सडामिऱ्या, राई, गणपतीपुळे, गुंबद, चांदोर, निवेंडी, करबुडे, निरूळ, बसणी, साठरे, मालगुंड, कुवारबाव, वेळवंड, कासारवेली, तोणदे, सोमेश्वर, केळ्ये, गणेशगुळे, पुर्णगड, कासारी, फणसोप, चिंद्रवली, झरेवाडी, रानपाट, भगवतीनगर, ओरी, भोके या ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये पुरूष किंवा स्त्री कोणही सरपंचपदासाठी उभा राहु शकतं. अशा प्रकारे तासाभरात तालुक्यातील 94 सरपंचपदाची आरक्षणसोडत झाली.