रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे 21 रुग्ण; नाचणे, टिळक आळीत प्रत्येकी चार पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- सोमवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात तब्बल 21 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 15 रुग्ण आरटिपीसीआर टेस्ट केलेले तर सहा रुग्ण हे अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. 
 

मागील काही दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र सोमवारी अचानक 21 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने रत्नागिरीकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. 
 

नव्याने 21 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट केलेले आहेत. सर्वाधिक चार रुग्ण हे नाचणे आणि टिळक आळी येथे सापडले आहेत. याशिवाय टीआरपी 2, शासकीय वसाहत 1, निवखोल 1, पोलीस मुख्यालय 1, सुभाष रोड 1, नर्सिंग हॉस्टेल 1, गवळीवाडा 1, सिटी पोलीस 1, बावनदी 1, मालगुंड 1 आणि आम्रपाली रत्नागिरी येथे एक रुग्ण सापडला आहे.