रत्नागिरी:- वाढत्या तापमानाने कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यात भूजल पातळीत घट झाली आहे. वाढत्या उष्णतेने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे जलस्तरही खालवत चालला आहे. अवकाळी ने कोकण किनारपट्टी भागात बरसण्याचा बागुलबुवा निर्माण झाला असल्याने आता एप्रिलच्या अखेरीस विहिरीतील आणि जलसाठ्यातील पातळीही खालावू लागल्या आहेत. त्यामुळे कोकणातील जिल्ह्यात पाणीटंचाईची तिव्रता वाढू लागली आहे.
कोकणातील 84 गावे तहानलेली असून त्यांना 78 टँकर द्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सर्वाधिक तहानलेली गावे ठाणे जिल्ह्यात असून ठाण्यात तहानलेल्या वाड्यांनी शंभरी पार केली आहे. तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात वाड्यांची संख्या अर्धशतक पार झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त भागात आता पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.
कोकण किनारपट्टी भागात यावर्षी जानेवारी महिन्यापासून अवकाळी पावसाचा ढग जमा झाले. मात्र अपवादात्मक स्थितीत काही भगाता पडल्यानंतर मळभ आणि वाढत्या तापमानाचा खेळच सुरू ऱाहिला. एप्रिल महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात उंचाकी तापमानाची नोंद झालीि तर रायगड जिल्ह्यातही तापमानाने 38 ते 39 अंशाची उचल घेतली होती. वाढत्या तापमानाने कोकणातील विशेषथ- दुर्गम भागातील जालत्र आता खालवू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर, खेड , मंडणगड आदी तालुक्यात पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे खेड तालुक्यात पहिला पाण्याच टँकर धावला.
कोकणातील ठाणे जिल्हा सर्वाधिक तहानलेला जिल्हा झाला आहे. ठाणे जिल्ह्यात पाण्या टंंचाईची तिव्रता वाढली असून 31 गावातील 124 वाड्या तहानलेल्या आहेत. टंचाईगर्सत भागांना 30 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 16 गावातील 25 वाड्या तहानलेल्या असून त्यांना पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात 15 गावातील तब्बल 52 वाड्या तहानलेल्या असून पाणी पुरवण्यासाठी या भागात 25 टँकर धावू लागले आ हेत. तर रायगड जिल्ह्यात 22 गावातील 52 वाड्यांसाठी 18 टँकर पाण्यासाठी धावू लागले आहेत.