रत्नागिरी आठवडा बाजार येथील जनरल स्टोअर्स दुकान फोडले

रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथील जनरल स्टोअर्स फोडून 14 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना 28 जुलै ते 29 जुलै दरम्यान घडली. याबाबतची खबर संजीव रसाळ (56 आत्मबंधू आर्केड रहाटाघर घर बस स्टँड शेजारी रत्नागिरी) यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजीव रसाळ यांचे आठवडा बाजार येथे भागीरथी जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे हे दुकान बंद करून 28 जुलै रोजी रसाळ हे घरी गेले होते. 29 जुलै रोजी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या जाळीचे कुलूप तोडून आणण्यात आले. दुकानाच्या गल्ल्यातील 14 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेण्याचे निदर्शनास आले. याबाबतची फिर्याद रसाळ यांनी शहर पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादवी कलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.