रत्नागिरीत शुक्रवारी उच्चांकी तापमानाची नोंद; पारा 38 अंशावर

रत्नागिरी:- जिल्ह्यात शुक्रवारी उच्चांकी तापमानाची नोंद झाली.हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पारा 38 अंशावर टेकला. वाढत्या उष्म्यामुळे रत्नागिरीकरांच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. शनिवारी देखील हीच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे. 

भारतीय हवामान खाते कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार  रत्नागिरी जिल्हयात 25 मार्च 2021 ते 27 मार्च 2021 रोजी काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पुन्हा हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे. आत्ता रत्नागिरीत 38 डिग्री से. तापमान आहे. तरी जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.