१७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे आयोजन
रत्नागिरी:- रत्नागिरीत प्रथमच जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. गणराज ग्रुपकडून या भव्यदिव्य अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे या स्पर्धेचे १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरीत आता क्रिकेटसह व्हॉलीबॉल स्पर्धेची क्रेझ देखील वाढत आहे. राज्यात व्हॉलीबॉल प्रीमियर लीग सुरू असताना आता रत्नागिरीत देखील जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. भव्यदिव्य अशी ही स्पर्धा गणराज ग्रुप कडून घेण्यात येणार आहे. स्पर्धेत निवडक संघाना स्थान देण्यात येणार असून शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. रात्रीच्या वेळेत होणाऱ्या या सामन्यांसाठी तज्ञ पंच उपलब्ध असणार आहेत. याशिवाय स्पर्धेत विजेत्या संघाना रोख पारितोषिक आणि मानाचा चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धक संघांनी आशिष सुर्वे 8805318585, साहिल मोंडकर 8668284477, मिलिंद मोरे 832947766 आणि गणेश डाफळे 8208232867 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी नाममात्र पाचशे रुपये ठेवण्यात आली आहे.