रत्नागिरीत थंडीचा पारा गोठला; कमाल तापमान घसरले

रत्नागिरी:- थंडीच्या हंगामात कोरड्या हवामानामुळे मुंबईसह  कोकण विभागात दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली असून थंडीच्या हंगामात म्हणजे नोव्हेंबरमध्ये ऑॅक्टोबरच्या हिटचा प्रभाव जाणवू लागला आहे.

मुंबईसह कोकण विभागात  कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. रात्रीचे किमान तापमान मात्र अद्यापही सरासरीखालीच असल्याने गारवा आहे. मात्र, त्यातही चढ-उताराची शक्यता आहे. दिवसाच्या कमाल तापमानातील वाढ आणखी चार ते पाच दिवस कायम राहणार आहे.

कोकणात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाळी स्थिती होती. ढगाळ वातावरणामुळे दिवसाच्या तापमानात मोठी वाढ न झाल्याने ‘ऑक्टोबर हिट’ची वातावरणीय स्थिती यंदाच्या हंगामात गडप झाली आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात बहुतांश भागात रात्रीच्या तापमानात घट होऊन थंडीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नोव्हेंबरचा प्रारंभ कोरड्या हवामानाच्या स्थितीत झाला. त्यामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ सुरू झाली. रात्रीचे किमान तापमान सध्या 1-2 अंशांनी सरासरीखाली आहे. त्यामुळे रात्री गारवा आहे. दिवसाचे कमाल तापमान मात्र वाढत आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात सर्वत्र दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 1.5 ते 2.5 अंशांनी वाढून 35 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले आहे. शुक्रवारी रत्नागिरीत 35.4 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. तर शनिवारी साकळी 32 अंश सेल्सियस तपमानाची नोंद झाली.
दरम्यान, सध्या रात्री आकाश निरभ्र आहे. मात्र, पुढील काही दिवसांत दक्षिणेकडील मोसमी पावसाच्या परिणामामुळे दिवसा आणि रात्रीही अंशत: ढगाळ स्थिती तयार झाल्यास दिवसाच्या तापमानात घट आणि रात्रीच्या तापमानात वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.