मित्रांना पाठवले पैसे हवे असल्याचे मेसेज
रत्नागिरी:- शहरासह खंडाळा येथील मुलींची फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेसबुक अकाऊंट हॅक करून हॅकर्सनी त्यांच्या मित्रांकडे पैशाची मागणी केल़ी तसेच अश्लिल फोटो देखील अपलोड केले होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच दोघा युजर्सनी तातडीने आपले फेसबुक अकाऊंट बंद केले. त्यामुळे फसवणूक होण्यापासून दोन्ही मुली बचावल्या.
रत्नागिरीतील नामवंत वकिल भावे यांच्या मोबाईल वरील व्हाट्स अँप हॅकिंगचे प्रकरण ताजे असतानाच आता फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचा प्रकार समोर आल़ा आहे. खंडाळा येथील राजेंद्र भडसावळे यांच्या पत्नी व मुलीचे अकाऊंट अज्ञातांनी हॅक केल़े. यावेळी हॅकर्सने भडसावळे यांनी मुलीच्या फेसबुक मेसेंजर वरून मित्रांना मेसेज पाठवून आपल्याला मदतीची गरज आह़े. त्यासाठी 10 हजार रूपये गुलल पे करा असा मेसेज पाठवल़ा. असाच प्रकार रत्नागिरी शहरातील चांदोरकर मसाले उद्योग यांच्या बाबतीतही घडल़ा. त्यांच्या नातेवाईकांचे देखील फेसबुक अकाऊंट अज्ञाताकडून हॅक करण्यात आल़े. तसेच आपण अडचणीत आहे. आपल्याला पैशाची गरज आहे अशी विनवणी या मसेजमधून करण्यात आल़ी. मात्र हा प्रकार या व्यवसायिकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने आपल्या मित्र परिवाराला कळवून फेसबुक अकाऊंट बंद केल़े.