रत्नागिरी:- शहरातील प्रख्यात मिठाई व्यावसायिक अनिल केशव किरपेकर यांचे आज निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७० इतके होते. शहरातील मारुती मंदिर येथे त्यांचे संगम मिठाईचे दुकान होते. उत्कृष्ठ दर्जाची मिठाई विकून त्यांनी अल्पावधीतच या व्यवसायात मोठे नाव केले होते. रेल्वे स्टेशन जवळ हॉटेल संगम या नावाने त्यांनी आपला नवा व्यवसाय देखील सुरू केला होता.
सोमवारी ते कौटुंबिक कार्यक्रमासाठी रोहा येथे गेले असता त्यांची तब्बेत बिघडली. मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी रत्नागिरीत धडकताच शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली तर शहर व्यापारी महासंघाकडून त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई असा मोठा परिवार आहे.