रत्नागिरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रियाझ मेमन यांचे अपघाती निधन

रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रियाझ मेमन यांचे बुधवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

बुधवारी रात्री सुमारे 1.30 च्या दरम्यान कोकरूडनजिक रियाझ यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांचे निधन झाले. रियाझ मेमन यांनी कमी वयातच बांधकाम क्षेत्रात खूप चांगले नाव कमवले होते. त्यांचा अचानक जाण्याने अनेकांनी हळ हळ व्यक्त केली. त्यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी 4 वाजता जामा मस्जिद शेजारी बाजारपेठ येथे होणार आहे.