रत्नागिरीतील प्रसिद्ध क्रिकेटपटू गोट्या सावंत यांचे निधन

रत्नागिरी:- रत्नागिरीतील ज्येष्ठ व प्रसिद्ध क्रिकेटपटू रणधीर उर्फ गोट्या प्रताप सावंत यांचे बुधवारी रत्नागिरी येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 45 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून गोट्या सावंत हे आजारी असल्याने शहरातील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सूरु होते.

ते एक उत्कृष्ठ फलंदाज व यष्टीरक्षक म्हणून प्रसिद्ध होते. मागील 12 वर्षापासून ते रत्नागिरीतील नवोदीत खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबीरे घेत असत. खेळाबरोबरच गोट्या सावंत यांचा मनमिळावू स्वभाव होता. सर्वाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी, बहिण असा परिवार आहे.