रत्नागिरी:- सोन्याचे दागिने बनवण्यासाठी दिलेले सोन्याचे बिस्किट आणि सोन्याची लगड असे एकूण 4 लाख रुपयांचे सोने घेउन पसार झाल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 25 नोव्हेंबर 2020 रोजी प्रदीप ज्वेलर्स येथे घडली आहे.
प्रलय पात्रा (सध्या रा.मुरुगवाडा,रत्नागिरी मुळ रा.पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात प्रदिप कुंदनलाल जैन(40,रा.आठल्ये संकुल गाडीतळ,रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार, जैन यांनी प्रलय पात्रा याच्याकडे 50 ग्रम सोन्याचे बिस्किट आणि 34.500 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असे एकूण 4 लाख रुपयांचे 84.500 ग्रॅम सोने दागिने बनवण्यासाठी दिले होते.परंतू प्रलय पात्रा ते सोन घेउन पसार झाला.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जैन यांनी शहर पोलिसांडे मंगळवारी रात्री उशिरा तक्रार दिली.अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वांगणेकर करत आहेत.