रत्नागिरी– रत्नागिरी शहरातील नाचणे रोड येथील कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेले अपेक्स हॉस्पीटल हे शासन दरसूचीप्रमाणेच कोविड रुग्णांवर उपचार करत आहे. येथे शासकीय लेखापाल असल्यामुळे जादा दराने कोणतेही बिल आकारले जात नाही. त्यामुळे अनावश्यक आर्थिक बोजा रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांवर पडत नाही. म्हणूनच स्वस्त उपचार करणारे अपेक्स हॉस्पीटल म्हणून रुग्णांचा ओढा याच रुग्णालयाकडे आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या पाहता खासगी असलेले अपेक्स रुग्णालय हे कोविड बाधित रुग्णांच्या उपचाराकरता शासन अधिसुचनेनुसार उपलब्ध करून देण्यात आले आहे. रुग्णांना अनावश्यक आर्थिक बोजा पडणार नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या देयकांची तपासणी करण्यासाठी देयक तपासणी पथक स्थापन केले आहे. हे पथक रुग्णालयाकडून आकारण्यात आलेले देयक योग्य देयक आहे ना याची खात्री करत आहे.
या पथकाचे प्रमुख स्थानिक निधी लेखा परीक्षा शाखेचे लेखाधिकारी श्री. संदीप पाटील मो. नं. ७७९८७०१२९२, स्थानिक निधी लेखा परीक्षा शाखेचे सहाय्यक लेखाधिकारी श्री. प्रफुल्ल कांबळे मो. नं. ९७६७६६२५८१, कनिष्ठ लेखा परीक्षक श्री. मनीष पवार मो. नं. ९५५२८९४८८० व जिल्हा रुग्णालयाच्या औषध निर्माण अधिकारी स्वाती जोशी या काम पाहत आहेत. अपेक्स हॉस्पीटलची बिले लेखाधिकारी श्री. संदीप पाटील स्वत: प्रमाणित करतात. जेथे अशी सुविधा नाही तेथे अतोनात बिले आकारली जातात.
१ जूनपासून राज्य सरकारने कोविड उपचार दरसूची नव्याने जारी केली. त्यानुसार अधिक स्वस्त दरात हे उपचार करण्याची हमी देण्यात आली आहे. त्यामुळे रूग्णांना योग्य व स्वस्त दरात उपचार होऊन त्यांना आर्थिक बोजापासून कमी ताण होईल. नवे दरपत्रक अपेक्स रुग्णालयालाही लागू झाले. लेखापरीक्षकांच्या मागदर्शनाप्रमाणेच हे कामकाज सुरू आहे, अशा प्रकारच्या सुविधा देऊन अनेक रूग्ण बरे झाले आहेत.
(ADVT)