रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रकिनारी रंगली आगळीवेगळी फिशिंग स्पर्धा

रत्नागिरी:- पर्यटकांना कोकणात आकर्षित करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून रत्नागिरी फिशर्स क्लबतर्फे दुसर्‍या राज्यस्तरीय ओपन सर्फ फिशिंग टूर्नामेंटचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण 80 स्पर्धकांनी यात भाग घेतला.

या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 7 वाजता करण्यात आले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही स्पर्धा सुरू होती. संपूर्ण भाट्ये किनार्‍यावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरीत प्रथमच आगळी वेगळी रॉड सर्फ फिशिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये भाग घेणारे काही स्पर्धक हे नविन तर काही अनुभवी होते. स्पर्धेमागचा मूळ उद्देश पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आहे. तसेच मासेमारी सारख्या स्पोर्टची ओळख निर्माण करणे असे असून रत्नागिरीवासींनी सुद्धा अश्या आगळ्या वेगळ्या स्पर्धचा लाभ घेतला.
 

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेत्यास 20 हजार रोख आणि सोबत रॉड व रिळ व अन्य फिशिंगच्या वस्तू देण्यात येणार आहेत. द्वितीय पारितोषिक विजेत्यास 15 हजार रोख आणि सोबत रॉड व रिळ व अन्य फिशिंगच्या वस्तू देण्यात येणार आहेत. तृतीय पारितोषिक विजेत्यास 10 हजार रोख आणि सोबत रॉड व रिळ व अन्य फिशिंगच्या वस्तू देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्‍त इतर पारितोषिकांची लयलूट केली जाईल. स्पर्धेमध्ये इतर बक्षिसे वेलकम गिफ्ट, फर्स्ट कॅच, मोअर कॅच, लास्ट कॅच, युनिक कॅच करिता सरप्राईज गिफ्ट आणि स्पर्धेच्या शेवटी लकी-ड्रॉ व इतर बक्षिसे देण्यात आली.