मिडलसेक्स संघाचे करणार प्रतिनिधित्व; प्रीमियर क्रिकेट लीगमध्येही सहभागी होणार
रत्नागिरी:- रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे हा इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहे. या स्पर्धेत तो मिडलसेक्स संघाचे प्रतिनिधित्व करेल.
कौंटी लीग ही सर्व युरोपियन देशांची निवडचाचणी स्पर्धा आहे. यातून प्रत्येक युरोपीय देशाच्या संघाची निवड केली जाते. अविराज हा मिडलसेक्सकडून प्रीमियर क्रिकेट लीगमध्येही सहभागी होणार आहे.
एकूणच कौंटी क्रिकेट लीगमधील १६ आणि प्रीमियर क्रिकेट लीगमधील असे ३० सामने ४ महिन्यांमध्ये (१० मे ते ६ सप्टेंबर) खेळणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या (केएसए) ए डिव्हिजन स्पर्धेत खेळताना प्रभावी लेगस्पिन फिरकी गोलंदाजी करून त्याने छाप पाडली. अविराज हा सध्या मेट्रो क्रिकेट क्लबमध्ये निरंजन गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे.
व्यावसायिक क्रिकेटपटू असलेल्या २० वर्षीय रविराजने मधल्या फळीत खेळताना फिनिशरची भूमिका बजावली आहे. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन (एडीसीए) संघातून क्रिकेटला सुरुवात करताना आपली गुणवत्ता दाखवून दिली. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या १४ व १६ वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार असताना त्याची भारताच्या १६ वर्षाखालील पश्चिम विभाग क्रिकेट संघात निवड झाली. रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच अशी संधी रत्नागिरीच्या खेळाडूला मिळाल. वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या अविराज याने अल्पावधीतच हे यश प्राप्त केले.
रविराजने त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमएचसीए), बीसीसीआयची झोनल क्रिकेट अकॅडमी (झेडसीए) आणि बीसीसीआयची राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी (एनसीए) संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या लीग स्पर्धेत ८१ विकेट मिळवून विक्रम मिळवला. ‘इनव्हायटेशन लीग’ स्पर्धेत अविराजने ४० विकेट घेताना २०६ धावा करत अष्टपैलू कामगिरी केली आहे. २०२२मध्ये झालेल्या एमसीए १६ वर्षांखालील आमंत्रित लीग स्पर्धेत (निवडचाचणी) एका डावात ६ आणि ४ विकेट घेत अविराजने निवडसमितीचे लक्ष वेधून घेतले.