रत्नागिरीकर पुन्हा रस्त्यावर; रास्तारोको, प्रशासनाविरोधात संताप

रत्नागिरी:- चंपक मैदानावर नर्सिंग विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारा नंतर रत्नागिरीत वातावरण तणावपूर्ण बनले आहे. सकाळी नर्सिंग संघटना आणि कर्मचारी रस्त्यावर उतरल्यावर सोमवारी सायंकाळी राजकीय पुढारी आणि सर्वसामान्य रत्नागिरीकर रत्नागिरीकर रस्त्यावर उतरले. आरोपीला फाशी द्या.. या मागणीसाठी जवळपास तीन तासांपेक्षा अधिक काळ जिल्हा ऋग्नलायासमोर रास्तारोको करण्यात आला.

चंपक मैदान येथे नर्सिंग चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग झाल्याची घटना समोर आली. यानंतर संताप व्यक्त करण्यात आला. सोमवारी सकाळी नर्सिंग संघटना रस्त्यावर उतरल्या नंतर सायंकाळी सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय पुढारी रस्त्यावर उतरले. सोमवारी सायंकाळी सहा वाजल्या पासून जिल्हा रुग्णालया समोर रस्ता रोको करण्यात आला. “पोलीस प्रशासन हाय हाय” अशा घोषणा देत जयस्तंभाकडे जाणारी तसेच मारूती मंदिरकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक अडवून ठेवली.