रत्नागिरीकर अनुभवणार मॉरिशसमधील सांस्कृतिक कार्यक्रम

रत्नागिरी:- रत्नागिरीत होणाऱ्या कोमसापच्या साहित्य संमेलना दरम्यान रत्नागिरीकराना मॉरिशस मधील सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी अनुभवता येणार आहे. १५ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता सावरकर नाट्यगृह येथे या अडीच तासांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोमसापचे विश्वस्थ प्रमुख रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आंतरराष्ट्रीय संस्कृतिक देवाण – घेवाण अधिक मजबूत व्हावी या हेतूने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे कीर यावेळी म्हणाले. डिसेंबर २०२३ रोजी कोमसापचे संमेलन मॉरिशस येथे घेण्यात आले होते. मॉरिशस सरकार आणि तीन शासनमान्य मराठी भाषिकांच्या संस्थानी एकत्रित येत हे संमेलन आयोजित केले होते. यावेळी सांस्कृतिक साहित्याची आदानप्रदान करण्याबाबत चर्चा झाली होती. या संमेलना दरम्यान कोमसाप कडून ५०० पुस्तक भेट देण्यात आली होती. यावेळी मॉरिशस कल्चरल मराठी सेंटर सोबत झालेल्या चर्चेनुसार २२ ते २५ जणांची टीम १५ एप्रिल रोजी रत्नागिरीत येत आहे. ही टीम अडीच तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे. सावरकर नाट्यगृह येथे सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. पाच प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार असून यात एकांकिका, जाखडी नृत्य आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.