रत्नसिंधू योजने अंतर्गत जिल्ह्यातील प्रमुख खाड्यांमध्ये सुरू होणार हाऊसबोट

रत्नागिरी:- कोकणच्या पर्यटन विकासासाठी आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात रत्नसिंधू योजनेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे भाट्ये, जयगड, मालदोली, दाभोळ, दापोली, बाणकोट आदी ठिकाणी खाड्यांमध्ये हाऊसबोट सुरू करण्यात येणार आहे.

मेरीटाईम बोर्ड खाड्यांतील सुरक्षिततेसंदर्भात अहवाल सादर करणार आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेचा उपक्रम आहे. रत्नसिंधू योजनेतून 3 कोटी अनुदान उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे कोकणच्या तरुणाईला रोजगार व पर्यटन विकासाला गती मिळणार
आहे.

तसेच बोट क्लबच्या माध्यमातून पॅरासेलिंग, समुद्रसफारी, सर्फर बोर्ड, बनामा स्पोर्टस आदी माध्यमातून कोकणातील जलपर्यटनाला चालना मिळणार आहे. बॅकवॉटर संकल्पनेचे ब्रँड मार्केटिंग करत केरळने जगाच्या पर्यटन नकाशावर आपले स्थान निश्चित केले आहे. केरळमध्ये बॅकवॉटर व्यवसायात 2300 हाऊसबोटमार्फत किमान 5 हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्ह्यातील भाट्ये, जयगड, सावित्री, वाशिष्ठी, जैतापूर पडेल, तिलारी, देवबाग, तारकर्ली, तेरेखोल, देवबाग, तारकर्ली आदी नद्या-खाड्यांमधील भुरळ घालणारे सौंदर्य, हिरवागार निसर्ग, रूचकर मासे दिमतीला असल्याने हा उपक्रम आता येथेही सुरू करण्यात येणार आहे.