रत्नागिरी:- गाड्या जाळण्याचे पुण्यातील लोन थेट रत्नागिरीतील ग्रामीण भागात पोहचले आहे. तालुक्यातील उक्षी सावंत-गुरववाडी येथील शिवम केळकर यांच्या जागेतील तीन वाहने अज्ञाताने मंगळवारी रात्री ११.३० वाजता पेटवूण दिली.यामध्ये तीनही वाहने जळून खाक झाली आहे. तर या प्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवम केळकर यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांच्या जागेतच त्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या दोन दुचाकी, एक क्वॉलिस कार उभी करुन ठेवण्यात आली होती. याच कालावधीत अज्ञाताना तिनही वाहने पेटवून दिली. त्यामध्ये दोन्ही दुचाकी पुर्णत: जळून खाक झाल्या तर क्वॉलिस कार अर्धवट जळालेल्या स्थितीत आहे.याप्रकरणी शिवम केळकर यांच्या तक्रारीवरुन ग्रामीण पोलीसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हे.कॉ.विनायक राजवैद्य करत आहेत.