रत्नागिरी:-महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिचे मुल दत्तक देण्याबाबत अडवणूक तसेच जबरदस्ती केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन संशयिता महिलांना अटक केली.सोमवारी न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.
फैमिदा शरीफ काझी (52, रा.पावस,रत्नागिरी) आणि संगिता प्रकाश शिंदे (51, रा.मिशन कंपाउंड सन्मित्र नगर, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित महिलांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात संचिता सुभाष यादव (31, रा.सरोदेवाडी संगमेश्वर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानूसार, मार्च 2022 मध्ये संशयित महिलांनी संचिता यादव यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे बाळ दत्तक देण्याबाबत विचारणा केली होती. त्यानंतर संचिता यादव जिल्हा शासकिय रुग्णालयात असताना 14 एप्रिल ते 16 एप्रिल 2022 त्यांच्या परवानगीशिवाय संशयित महिला त्यांच्यासोबत रुग्णालयात राहिल्या होत्या.त्यानंतर 16 एप्रिल रोजीच संशयित महिलांनी संचिता यादव यांना मुलासह एका लॉजिंगवर नेउन पुन्हा पुन्हा मुल दत्तक देण्याबाबत अडवणूक केली.तसेच संचिता यादव यांच्या पतीकडून लॉजिंग आणि जिल्हा शासकिय रुग्णालयात झालेल्या 5 हजार रुपयांची मागणी केली होती.
याप्रकरणी यादव यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी सोमवारी संशयित महिलांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.