रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वरवडे खारवीवाडा येथे 9 वर्षीय मुलाच्या निधनानंतर आईचेही 2 दिवसातच प्राण सोडले. आधी मुलगा आणि नंतर आईच्या झालेल्या निधनाने वरवडे येथील पालशेतकर कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
अनुज तुळशीदास पालशेतकर (९) या मुलाचे मंगळवार ८ फेब्रुवारी रोजी निधन झाले. मुलाच्या निधनानंतर व्याकुळ झालेल्या मातेचेही दोन दिवसात म्हणजे ११ फेब्रुवारी रोजी दुपारी निधन झाल्याने पालशेतकर कुटुंबासह दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वरवडे परिसरात शोककळा पसरली आहे. सुजाता तुळशीदास पालशेतकर असे त्या मातेचे नाव आहे.
अनुज पालशेतकर हा अतिशय जिज्ञासू चुणचुणीत मुलगा होता. इयत्ता ४ थी वर्गात तो शिकत होता. वरवडे हायस्कूलचे शिक्षक रामदास पालशेतकर यांचा तो पुतण्या होय. प्राथमिक शाळेत अनुज सर्व उपक्रमांमध्ये अग्रक्रमाने सहभाग घेत असे. हसत्या खेळत्या बालवयात अनुजच्या दुर्दैवी निधनानंतर आईचेही निधन झाल्याने खारवीवाडासह वरवडे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.