रत्नागिरी:- तालुक्यातील भोके-रेवाळेवाडी येथे मुलाचे कपडे चोरल्याच्या गैरसमजातून पती-पत्नी आणि त्यांच्या मुलाला लाथा बुकक्यांनी मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तीन जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना बुधवार 16 ऑगस्ट रोजी स.9.45 वा.घडली आहे.
विजय यशवंत रेवाळे, संदीप यशवंत रेवाळे, चंद्रकांत उर्फ चंदू यशवंत रेवाळे (सर्व रा.रेवाळेवाडी भोके, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,त्यांचा मुलगा अक्षय याने विजय रेवाळे यांच्या मुलाचे कपडे चोरल्याच्या गैरसमजातून संशयितांनी फिर्यादीच्या घरात घुसून शिवीगाळ करत त्यांना लाथा बुकक्यांनी मारहाण व ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी संशयितांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 451, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.