रत्नागिरी:- तोक्ते चक्रीवादळग्रस्त नुकसानीचा आढावा आणि कोविड परिस्थितीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीत दाखल झाले आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (शुक्रवारी) भेट देऊन पाहणी करणार आहेत.
शुक्रवारी सकाळी ८.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन मुख्यमंत्री यांचे आगमन झाले. विमानतळ येथेच कोविड आणि वादळ नुकसान याची आढावा बैठक सुरू झाली आहे. यानंतर हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे जाणार असून वायरी, ता.मालवण येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. मालवण येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. तसेच निवती, ता. वेंगुर्ला येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
यानंतर चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मुख्यमंत्री नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक घेणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळ येथे येऊन दुपारी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.