मुंबई विद्यापिठाच्या उपकेंद्राला चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव

रत्नागिरी:-मुंबई विद्यापिठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव देण्याचा ठराव विद्यापिठाच्या व्यवस्थापन समितीमध्ये घेण्यात आला असून लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपकेंद्राचे नामकरण केले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.

ऑनलाईन झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याची घोषणा केली. ज्येष्ठ चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव उपकेंद्राला देण्यात यावे अशी मागणी गेले अनेक वर्ष रत्नागिरीतील साहित्य क्षेत्राकडून होत होती. विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत याबाबत ठराव करण्यात आला. उपकेंद्राचे नामकरण करतानाच त्याठिकाणी कीर यांचे साहित्य अभ्यासासाठी ठेवले जाणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.

जिल्ह्यात बाधित रुग्ण सापडण्याची टक्केवारी 17 च्या पुढे आहे. तर मृत टक्केवारी 3.31 पर्यत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा समावेश रेडझोनमध्ये करण्यात आला आहे. जिल्ह्यातील डेथरेट कमी झाला पाहिजे.त्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्याला खनीकर्मच्या निधीमधून रुग्णवाहिका देण्यात आल्याअसून शुक्रवारी त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. कोव्हीड रुग्णांसाठी ऍन्‍रॉनचे निरामय रुग्णालय ताब्यात घेतले जाणार आहे. त्यासाठी पाहणी करण्यात येणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.