खेड:- कोकणात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून मुबई गोवा महामार्गावर दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. मुबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या अपुऱ्या कामामुळे सतत दरडी कोसळत आहे. कामथे घाटातील दरडी नंतर आज भोस्ते घाटात दरड कोसळली आहे त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. वाहन चालकांनी स्वतःहून दरड बाजूला केल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.
दिवसेंदिवस कोसळणाऱ्या दरडी मुळे मुबई गोवा महामार्ग ठप्प होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भुईबावडा, आंबोली, करूळ, फोंडा घाट अशा घाटामध्ये वारंवार दरडी कोसळत आहेत मात्र दरवर्षी अशा घटना घडत असूनही सार्वजनिक बांधकाम खाते कायमस्वरूपी उपाययोजना करत नसल्याने जनतेत नाराजी आहे. या घाटांची दरवर्षी देखभाल केली जावी आणि प्रवाशावर दुर्दैवी प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे .