रत्नागिरी:- पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई – गोवा महामार्गाला दणका दिला आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा ते निवळी यादरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू असलेला रस्ता खचला आहे. सद्यस्थितीत एका बाजूने वाहतूक सुरू आहे.
बुधवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे हातखंबा ते निवळी यादरम्यान चा रस्ता खचला आहे. महामार्ग चौपदरीकरणामध्ये रत्नागिरी तालुक्याच्या हद्दीतील काम आधीच बराच काळ रखडले . आता या कामाने गती घेतली मात्र बुधवारच्या मुसळधार पावसाने चौपदरीकरणासाठी टाकलेला भरावा खचला आणि त्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. सध्या एका बाजूने वाहतूक सुरू आहे. मात्र मातीचा भराव खचणे न थांबवल्यास आणि पुन्हा मुसळधार पाऊस पडल्यास रस्ता आणखी खचण्याची शक्यता आहे.