खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील महाड हद्दीतील लोहारमाळनजीक टाटा सुमोने उभ्या ट्रकला मागून धडक देत अपघात झाल्याची घटना रविवारी सकाळी 7.15 वाजता घडली. अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून एक किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना उपारासाठी डेरवण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आदित्य जयवंत कामत (32, लांजा-सुतारवाडी), रूक्मिणी विठोबा शिंदे, प्रीयंका प्रकाश शिंदे, सुनंदा नारायण शिंदे (सर्व रा. नांदेड-भगतेवाडी), संदेश सदानंद माने (लांजा-जाधववाडी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांया हातापायासह डोक्याला गंभीर दुखापती झालेली आहे. संजय दत्ताराम भगते यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वप्रथम जखमींना पोलादपूर शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्याने डेरवण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालक आदित्य कामत हा आपल्या ताब्यातील एम.एच.04/ एफ.आर. 2692 कमांकाच्या टाटा सुमोतून 6 जणांना घेवून मुंबईहून रत्नागिरीकडे जात होता. लोहारमाळनजीक आला असता सध्याया साईडपट्टीवर उभ्या असलेल्या जी.जे.19/ एस.6830 कमांकाया ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात सुमाया दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. अपघाताचे वृत्त कळताच महाडचे महामार्ग पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय भोसले व सहकारी तातडीने पोहून मदतकार्य केले.