रत्नागिरी:- मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. एकवेळ मरेन पण पक्ष कधीच सोडणार नाही. मी आतापर्यंत भूषवलेली पद फक्त आणि फक्त शिवसेनेमुळेच. मी पक्ष सोडणार असल्याच्या फक्त वावड्या असून मी कधीच पक्ष सोडणार नसल्याचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले.
माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी शुक्रवारी रात्री उशिरा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. काही लोक नाहक बदनामी करत आहेत आणि मी कधीही शिवसेना सोडणार नाही मला भेटायला आलेले एकवेळ भाजपला सोडून सेनेत येतील असे परखड मत राहुल पंडित यांनी ना. उदय सामंत यांच्याजवळ मांडले. काल भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी राहुल पंडित यांची भेट घेतली होती. त्या नंतर रत्नागिरी शहरात राहुल पंडित बिजेपीत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चेवर पडदा पडला आहे.