मिऱ्या-पाटीलवाडी येथे बंधारा उद्ध्वस्त 

रत्नागिरी:- मिर्‍या पाटीलवाडी येथे काही मिटरचा बंधाराच समुद्राने गिळंकृत केलेला आहे. त्यामुळे समुद्राच्या उधाणाचे पाणी थेट रहिवाशांच्या घराला धडकत आहे. रहिवाशी जीव मुठित घेऊन दिवस काढत आहे. त्यामुळे प्रशासन मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहाते की काय असा, सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. 

सुमारे साडे तीन किमीचा मिर्‍या धुपप्रतिबंधक बंधारा तेथील रहिवाशांचे समुद्राच्या उधाणापासून रक्षण करतो. मात्र उधाणाच्या अजस्र लाटांमुळे बंधार्‍याचे छोटे-मोठे दगड वाहुन जाऊन बंधार्‍याची ठिकठिकाणी वाताहात झाली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत काही ठिकाणी तत्पुर्ती मलपट्टी करण्यात आली आहे. मात्र पांढरा समुद्र, जयहिज चौक, भाटीमिर्‍या, आलावा हे भाग काहीशे सुरक्षित आहे. मात्र पाटीलवाडी हा भाग आता पुर्णतः धोकादायक बनला आहे. या भागातील काही मिटरचा बंधाराच गायब झाला आहे. बंधाराच नसल्याने या भागातील काही रहिवाशांच्या थेट घरापर्यंत पाणी येत आहे. उधाणामुळे माड, शौचालय देखील समुद्राने गिळंकृत केले.