रत्नागिरी:- शहरालगतच्या मिरजोळे पाटीलवाडी येथील नदीकिनारी जंगलमय भागात गावठी दारूच्या हातभट्टीवर शहर पोलिसांनी धाड टाकल़ी. यावेळी एकाला ताब्यात घेण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आल़ा त्याच्याकडून 15 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच दारूभट्टीचे साहित्य उद्धस्त करण्यात आल़े. अक्षय अविनाश पालकर (33, ऱा शिरगांव आडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 26 मार्च 2023 रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांच्या पथकाकडून धाड टाकण्यात आल़ी. यावेळी संशयित आरोपी अक्षय हा अवैधरित्या हातभट्टी चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आल़े त्यानुसार अक्षय याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनिमय 65 ब, क, ड, फ, ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा.