रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे येथील मधलीवाडी-वाडकरवाडी दरम्यानच्या खालचापाट परिसरातील शेतजमीन दरवर्षी अतिवृष्टीमुळे होणार्या मोठ्या भुस्खलनावर अजूनही पतिबंधात्मक योजनांची शेतकर्यांना पतिक्षा राहिली आहे. त्यासंदर्भात नुकतीच प्रशासनामार्पत तहसिलदार व भुजलसर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱयांनी पाहणी केली.
सातत्याने होत असलेल्या खालचापाट परिसरातील शेतकरी हताश झालेले आहेत. या होत असलेल्या भूस्खलनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी यापूर्वीच पाटबंधारे विभागाने 1 कोटी 35 लाखांचा पस्ताव तयार केला होता. पण येथील खचणाऱया अर्ध्याभागात संरक्षक भिंत उभारण्यात आली. उर्वरित खचणार्या शेतीचे नुकसान टाळण्यासाठी नदीपात्राकडेच्या मोठ्या भागात संरक्षक उपाययोजनांची येथील शेतकऱयांना अजूनही पतिक्षा लागून राहिली आहे. अतिवृष्टीच्या काळात याठिकाणी होणार्या या सततच्या भूस्खलनामुळे शेती संकटात आली आहे.
त्याठिकाणचे होणारे नुकसान पाहता जिल्हा प्रशासनस्तरावरून पुन्हा कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. सोमवारी रत्नागिरीचे तहसिलदार म्हात्रे व भुजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी संदीप माने यांनी भुस्खलनामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी तलाठी संदेश घाग ग्रामस्थ भाउ भाटवडेकर, पोलीस पाटील सौ. जोशी, तसेच शेतकरी यांची उपस्थिती होती. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.