रत्नागिरी:- चिपळूण येथील अमली पदार्थ विरोधात झालेल्या कारवाईनंतर पोलिस दलाने जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधक जोरदार मोहिम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शहरातील
मिरकरवाडा येथे कोंबींग ऑपरेशन करून दीड किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी ६ नेपाळ्यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थांची जोरदार तस्करी आणि विक्री सुरू असल्याचे प्रकार उघडकीस आले. या विरोधात जिल्हा पोलिस ॲक्शन मोडवर येऊन त्याने कारवाई सुरू केली गेल्या दोन महिन्यांमध्ये सात ठिकाणी छापी टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चरस, हेरॉईन आणि गांजा असे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आली होती. दोन दिवसापूर्वीच चिपळूण शहरातील अशाच प्रकारे भरवस्तीतील एका बंद इमारतीमध्ये गांजाचे सेवन करून नशीब तर असलेल्या चौघांना ताब्यात घेतले होते अमली पदार्थांचा वाढता वेळ का लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये कोंबिंग ऑपरेशन करत अमली पदार्थ विरुद्ध मोहीम हाती घेतले आहे.
स्थानिक ज्ञान विषयी शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून शहरातील मिरकर वाडा येथे छापा टाकण्यात आला या छाप्यामध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात गांजा सापडला आहे. पोलिसांनी कारवाईत दीड किलो गांजा जप्त केला आहे. तर ६ संशयित ताब्यात घेतले आहेत. यावरून रत्नागिरी शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची खरेदी, विक्री होत असल्याचे स्पष्ट होत आहे.