रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथील बोटीवर काम करणार्या नेपाळी खलाशाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.10 वा.घडली.
रामप्रसाद चौधरी (39, मुळ रा. नेपाळ सध्या रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या नेपाळी खलाशाचे नाव आहे. रामप्रसाद हा मोरासिन अब्दुल रज्जाक वाडकर यांच्या सामिउल्ला खातून नावाच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. बुधवार 14 फेब्रुवारी रोजी रात्री बोटीवर जेवण करुन तो झोपी गेला होता. गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी त्याच्या सोबत बोटीवर असलेला तुलसीराम डगोरा थाउ याने रामप्रसादला उठवण्याचा प्रयत्न्ा केला असता तो कोणतीही हालचाल करत नव्हता. म्हणून त्याने ही बाब बोट मालक मोरासिन वाडकर यांना सांगितली. त्यांनी रामप्रसादला रुग्णवाहिकेतून तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.