रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथे 14 हजार रुपयांचा 700 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळणार्याला शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवार 17 सप्टेंबर रोजी रात्री 10.45 वा.करण्यात आली.
महंमद ताहिर इब्राहिम मस्तान (32, रा.मिरकरवाडा, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रविवारी रात्री शहर पोलिस मिरकरवाडा परिसरात गस्त घालत असताना त्यांना मिरकरवाडा नाका येथे संशयित हा आपल्या ताब्यात 700 ग्रॅम गांजा बाळगुन असलेल्या अवस्थेत मिळून आला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.