रत्नागिरी:- मिरकरवाडा जेटीवर अतिक्रमन करून बसणाऱ्या मासळी विक्रत्यांना आज मत्स्य विभागाने पोलिस आणि कस्टमच्या मदतीने हटवले. या कारवाईमुळे काहीसा गोंधळ झाला. मात्र त्यानंतर विक्रेत्यांना मच्छीमार्केटमध्ये बसविण्यात आले. परंतु तिथेही प्रवेशद्वाराजवळ कोण बसणार यावरून
विक्रत्यांमध्ये वाद सुरू आहे. चिठ्ठी काढुन हा वाद उद्योजक किरण सामंत हे सोडवणार आहेत.
मिरकरवाडा जेटीवर मासे विक्री करणाऱ्या विक्रत्यांची चांगली सोय व्हावी, यासाठी मत्स्य विभागामार्फत १
कोटी रुपये खर्च करून मच्छीमार्केट बांधण्यात आले आहे. परंतु विक्रत्यांची व्यवस्था करूनही या
मार्केटमध्ये न बसता विक्रते जेटीवर अतिक्रमन करून बसत होते. त्यामुळे या भागात प्रचंड वाहतुक कोंडी
होत होती. यापूर्वी मत्स्य विभागने अतिक्रमन हटवून जेटीवरील १५ फुटाचा जागा रिकामी ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी काही विक्रत्ये जेटीवर बसत होते. मत्स्य विभागाने रिक्षा फिरवून ध्वनिक्षेपकावरून
कारवाईचा इशारा दिला होती. तरी मिरकरवाडा जेटीवर अतिक्रम होत होते. त्यामुळे आज मत्स्य विभागान पोलिस आणि कस्टमची मदत घेऊन अतिक्रमन करणाऱ्या विक्रत्यांना जोटीवरून हटविण्यात आले. त्यांना मच्छीमार्केटमध्ये बसण्याच्या सूचना केल्या.
परंतु सुरवातीला जे विक्रते गेले आणि त्यांचे वजन आहे त्यांना मार्केच्या प्रवेशद्वारावरील ओटे मिळाले.
त्यामुळे मासे विक्रीमध्ये त्यांना फायदा झाला. परंतु मार्केटमधील आतमध्ये ज्यांचे ओटे आहेत, त्यांच्या
मासळीची कमी विक्री झाल्याचा त्यांचा आरोप आहे. यावरून विक्रत्यांमध्ये काहीचा वाद सुरू झाला. अखेर
हा वाद किरण उर्फ भैय्या सामंत यांच्यापर्यंत गेला. त्यांनी चिठ्ठ्या टाकून ज्याची चिठ्ठी येईल त्यांना
प्रवेशद्वारावरील ओट्यावर बसण्यास मिळणार आहे. त्यामुळे सध्यातरी या वादावर आणि अतिक्रमनावर
पडदा पडला आहे.