माहिती अधिकारात माहिती मागवल्याच्या रागातून सरपंचाची कुटुंबाला धमकी

संगमेश्वर:- ग्रामपंचायतीतील निधीचा विनियोग कसा झाला याची माहीती अधिकारात माहीती मागवली याचा राग मनात ठेवून सरपंच व त्याच्या भावांनी घरात घुसून मारहाण करू अशी धमकी दिल्याची तक्रार पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या प्रकरणी सरपंचासह तीन जणांवर संगमेश्वर पोलिसांनी भादवि कलम ५०४.५०६.व ३६ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

याबाबत पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे ग्रामपंचायतीत मागील काळात विविध कामांवर शासकीय निधी खर्च करणेत आला असून त्या विविध कामाची व खर्च झालेल्या निधीची माहीती मिळावी म्हणून गावातील मुळ रहीवासी (सद्या राहणार भाईंदर) संतोष श्रीधर पवार यांनी माहीती अधिकारात ग्रामपंचायकडे माहीती मागवली आहे. त्याचा राग सरपंच विजय पवार व त्याचे बंधू मुकुंद पवार व सुनिल पवार यांना आला. त्यांनी तक्रारदार व त्यांचे पती यांना दमदाटी करून शिविगाळ केली तसेच माझा मुंबई भाईंदर येथे वास्तव्यास असलेला मुलगा संतोष पवार यास भाईंदर येथिल घरात घूसून मारून टाकू अशी धमकी दिलेची तक्रार संतोषची आई शारदा श्रीधर पवार (वय ६५ रा. शिरंबे सातभाई वाडी) यांनी माखजन पोलिस दुरक्षेत्रात केली आहे. त्याची दखल पोलिसांनी घेत ३ नोव्हेंबर  रोजी अदखलपात्र गुन्हा  दाखल करून तपास सुरू केला आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक झावरे यांचे मार्गदर्शनाखाली माखजन दुरक्षेत्राचे हेड काँन्टेबल चंद्रकांत कांबळे करीत आहेत