पावस:- तालुक्यातील गावखडी- सुरुबन येथे मासे पकडण्यासाठी गेलल्या वृद्धाचा बुडून मृत्यू झाला. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमित प्रभाकर तोडणकर (वय ६२, रा. भंडारवाडी-गावखडी, ता.
रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १२) दुपारी एक च्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध तोडणकर रविवारी सकाळी नऊच्या सुमारास मासेमारीसाठी जाळे घेऊन गावखडी येथील सुरुबन परिसरात मासे पागण्यासाठी गेले होते. सकाळी अकरा पर्यत घरी परतले नाही म्हणून घरच्यासह ग्रामस्थांनी शोधा शोध केली त्यावेळी सुरुबन येथे ते मृतावस्थेत आढळले. तत्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.